विनंती: थेट comments लिहा. उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!

(पूर्वी facebook इत्यादी वापरून लिहिलेल्या बऱ्याचशा प्रतिक्रिया- comments- आता काही तांत्रिक कारणास्तव पाहता येत नाहीत. तरीही, इतर मार्गांनी प्रतिक्रिया लिहिण्यास नक्कीच वाव आहे!)

मंगळवार, ३१ मे, २०११

अश्लील शब्द + सभ्य वापर + प्रश्न


{ Blog Post # 4 }(हे वाचून कमकुवत संवेदना दुखावण्याची शक्यता आहे. क्षमस्व!)


    मला सुदैवाने असे काही मित्र आहेत ज्यांच्याशी उगाच मारलेल्या गप्पा 'चिंतन' असू शकतात आणि काहींचे  'चिंतन' म्हणजे वायफळ गप्पा!आज जरा उशिराने लिहितोय. लिहू की नको- अशा द्विधेत होतो. एक तर आपला, 'मुरली मनोहर जोशी' होण्याची भीती! दुसरं, हे 'मी' लिहू शकेन का नीट? अशी शंका. असो, भीती दूर झाली कारण आज जे मी लिहितोय त्या 'ज्ञानाचा' अविभाज्य भाग असलेला माझा मित्र : ओंकार देशमुख याने the Netherlands हून हिरवा कंदील दाखवला. शंकेचे काय, ती राहणारच.. 

तर, आज मी अश्लील परंतु सभ्य शब्दांविषयी लिहिणार आहे. अगदी थोड्याशाच, जेवढे मला माहित झालेत तितकेच!

हा साक्षात्कार ओंकारशी २०१० च्या उन्हाळ्यात झालेल्या गप्पांचा परिपाक आहे. 
सुरुवात, हरी तात्यांवरून झाली. (संदर्भ: पुलं- व्यक्ती आणि वल्ली )
शाहिस्तेखानाची गोष्ट सांगतायत तात्या. 
"महाराजांना हरामखोर म्हणाला हा ....... इथे शाहिस्तेखानाला उद्देशून एक सणसणीत शिवी असायची... ती जर शाहिस्तेखानाने ऐकली असती तर दुसरा हात पुढे करून म्हणाला असता- वाटल्यास या हाताचीसुद्धा बोटे कापा पण शिवी नका देऊ" 
.. ओंकारला अशी वाक्यं जशीच्या तशी आठवतात! 
तर, यावाक्यामुळे शिव्यांचा विषय निघाला आणि मघईचे पान रंगावे तसा 'आंबटशौक' रंगात आला. बोलता बोलता रोज सहज दिसणाऱ्या या हिरव्या-लाल रंगाचे अंतरंग उलगडले आणि अवाक झालो! मला 'असं' काही माहित नव्हतं !

( जे डोळे विस्फारून, आतल्या आत उड्या मारू लागले असतील त्यांना : आम्ही जरी 'अश्लील आणि सभ्य' अशा संयुक्त शब्दांचा प्रवास केला असला तरी तो इथे जसाच्या तसा आणि संपूर्ण देणे शक्य नाही ;) खरंतर तो पूर्ण द्यायला हवा. कारण त्यात माणूसपणाची व्याख्या सापडते आणि परिपक्वतेचे उदाहरण! गप्पांची मजाच काही और असते, असो! )

अगदी सहज वापरले जाणारे, रोजच्या वापरातील बरेच शब्द अश्लील असतात! किबहुना आहेत! इथे या युक्तिवादाला थारा नाही की त्यांचे शब्दशः अर्थ वेगळे होतात. कारण, त्यांचे जे शब्दशः अर्थ होतात तेच अभिप्रेत असतात!

हे शब्द मी सुद्धा सहज वापरतो. (वापरायचो? ) आणि कोणत्याही वर्तमानपत्रात सुद्धा सभ्य पानांवर हे शब्द असू शकतात!

काही उदाहरणं आणि त्यांचे अर्थ:

एखाद्या माणसाची खूपच ओढाताण होत असेल तर आपण 'कुत्तरोढ' होतीये असे सहज म्हणतो... साळसूदपणे याचा अर्थ: कुत्र्याप्रमाणे हाल होणे ! पण ओढाताणीशी कुत्र्याचा काय संबंध? तर या शब्दाचा अर्थ: कुत्री जेंव्हा समागम करतात तेंव्हा कधी कधी त्याच अवस्थेत अडकून बसतात आणि ओढू-ताणू लागतात. यावरून कुत्तरोढ शब्द घडतो! गमतीचा भाग असा की बऱ्याच बायका हा शब्द नवऱ्यासाठी सर्रास वापरतात, "फार कुत्तरोढ होते ग यांची मधल्या मध्ये.." ऐकल्यासारखं वाटतंय? :D

वाट लागली या अर्थाने 'घुसली', 'फाटली' असे शब्द फक्त कट्ट्यांवर नाही तर पुण्यासारख्या ठिकाणी दुकानातून किंवा पेठांमधून फिरताना सुद्धा ऐकू येतात. 'लागली' हा सभ्य शब्द मानला तरी 'घुसली', 'फाटली' यांचा नेम 'पृष्ठभागात घुसली' असा लागतो. या-अशा शब्दांना कोणीही स्त्री-पुरुष सहज आणि जाणून-बुजून वापरतात. काही शब्द माहित असूनही मनापासून वापरले जातात असा अंदाज आहे. 'हलवणे' या निरागस क्रियापदाचाही सामान्य सभ्यांकडून सर्रास वापर होतो.

बेशिस्त कारभाराला 'गलथान' कारभार म्हंटल जातं. आता हा तर फारच सहज वापरला जाणारा शब्द.. 'गलथान कारभार आहे नुसता!' .. कितीदा आणि कितीप्रकारे ! पण याचा अर्थ भयानक आहे. जर बाईने/ प्रौढ स्त्रीने आपली "थान" (स्तन या शब्दाचा गावाकडील प्रयोग ) बांधून ठेवली नाहीत तर जे काही होतं त्यास  गलथान म्हणतात ... हा अर्थ कळल्यावर मला भोवळच यायची होती! पण अजून आहेत..

भोंगळ हा शब्द तुम्ही कितीदा वाचला / ऐकला आहे? अगदी आठवड्यातून दोन-तीनदा सुद्धा असेल! या शब्दाचा अर्थ 'आपली जननेन्द्रिये न झाकलेला पुरुष!' .. आता वापरा हा शब्द?

....

असे अजूनही बरेच शब्द आहेत. 

उद्देश हा मुळीच नाही की तुमच्या इच्छा आणि आंबटशौक चाळवून पहावेत. 

प्रश्न असा आहे, की या गोष्टींची गरज समाजाला का भासते? तुम्हाला भासली का? का??

निरागस आणि नितांत सुंदर विषयांना विकृतीचे आणि बटबटीत कल्पनांचे विद्रूप कोंदण भोगावे लागते. मी सुदैवी की सहजता आणि सत्यता यांची सांगड घालता आली असावी मला.. तुम्ही सुद्धा असाल! पण आपण सगळे नाही. शिक्षण हा एकच दुवा आहे का यासाठी? की अजून काही करता येईल? तुम्हाला काय वाटतं?


***उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!


१२ टिप्पण्या:

सुदीप मिर्ज़ा म्हणाले...

interesting!

Shrikant Wad म्हणाले...

thanks Sudeep!

deepika म्हणाले...

apala "murli manohar joshi" hone mhanje kay?
-Deepika

sanket म्हणाले...

नवे ज्ञान मिळाले, माहित नव्हते "कुतरओढ आणि गलथान " या शब्दांबद्दल.
बाकी तुम्ही लेखाच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे बुवा, विचार करावा लागेल.

Shrikant Wad म्हणाले...

@sanket:

धन्यवाद! जरूर विचार करा, त्यासाठीच तर लिहिलंय!

Shrikant Wad म्हणाले...

@Deepika:


संसदीय समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी इतरांनी ऐनवेळी मते फिरवल्याने एकाकी पडले होते.. थोडं फार बातम्यांकडे लक्ष असू द्यावं ! ...असो, एवढ्यावरून कळले असेल :)

हेरंब म्हणाले...

हाहाहा.. जबरदस्त आहे हे.. गलथान, कुतरओढ, भोंगळ हे शब्द तर वर्तमानपत्रातही नियमित वापरले जातात. :)))

Shrikant Wad म्हणाले...

@हेरंब

धन्यवाद!
हो खरं आहे :D

Yogesh म्हणाले...

हा..हा...हा...जबरदस्त...एक नंबर पोस्ट आहे :) :)

Shrikant Wad म्हणाले...

@Yogesh

धन्यवाद!

सुहास म्हणाले...

आजच ह्या लेखाची लिंक हेरंबने दिली.. अगदी अफाट लिहिलंय. बाकी ब्लॉगवरील लेख वाचायला घेतोच. तूर्तास ही एक पोच :)

पुलेशु :) :)

Shrikant Wad म्हणाले...

@सुहास

स्वागत आहे !

मनमोकळेपणाने लिहा. आपली ओळख झाकावीशी वाटली तर Open-ID चा वापर करा.

भाषा आणि लिपी सुसंगत असू द्या. उदा. मराठीतून लिहिताना देवनागरी लिपी वापरा.

शक्यतो email पाठवू नका, मात्र त्याऐवजी comment जरूर लिहा- ते सोपे आणि सोयीस्कर आहे.

MyFreeCopyright.com Registered and Protected