विनंती: थेट comments लिहा. उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!

(पूर्वी facebook इत्यादी वापरून लिहिलेल्या बऱ्याचशा प्रतिक्रिया- comments- आता काही तांत्रिक कारणास्तव पाहता येत नाहीत. तरीही, इतर मार्गांनी प्रतिक्रिया लिहिण्यास नक्कीच वाव आहे!)

मंगळवार, ५ जुलै, २०११

आटव









{ Blog Post # 7 }

नमस्कार,


मी सातत्याने ब्लॉगवर लिहित नाही अशी काहींची तक्रार आहे. माझे म्हणणे असे की, आपल्या प्रतिक्रिया सुद्धा सातत्याने येत नाहीत किंवा वाचकांची वाढती संख्या- हुरूप कुठून आणायचा? असो :) कधीकधी लहान मुलासारखा हट्ट धरायला काय हरकत आहे? 

आज कविता.. 

(समजलीच तर टीका-समीक्षेची अपेक्षा आहे)

शीर्षक- आटव

उन्हं सोसून सोसून
गेले डोळेही आटून
पाऊस वळवाचा सुद्धा
नाही जात ओलावून

पाऊस वळवाचा येई
ठेका पाचोळ्याला देई
मी पांघरली धूळ
कशी ओरबाडून नेई

पाऊस गर्जत येतो
पाऊस बरसत येतो
आल्हादाचे मृगजळ
मागे ठेवूनच जातो

पुन्हा तापते जमीन
पुन्हा होतो शीण शीण
वाट पाहती पावसाची
माझे डोळे पाण्याविण

स्वर जड होत नाही
हुंदकाही उमटत नाही
उन्हं आटविती डोळे
पाऊस पडतच नाही
-------------

 उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता आणि इच्छा असल्यास मोबाईल क्रमांक जरूर कळवा.. आणि ब्लॉगशी जोडलेले रहा! मला twitter वर देखील follow करू शकता.. उजवीकडे 'about me ' पहा!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मनमोकळेपणाने लिहा. आपली ओळख झाकावीशी वाटली तर Open-ID चा वापर करा.

भाषा आणि लिपी सुसंगत असू द्या. उदा. मराठीतून लिहिताना देवनागरी लिपी वापरा.

शक्यतो email पाठवू नका, मात्र त्याऐवजी comment जरूर लिहा- ते सोपे आणि सोयीस्कर आहे.

MyFreeCopyright.com Registered and Protected