विनंती: थेट comments लिहा. उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!

(पूर्वी facebook इत्यादी वापरून लिहिलेल्या बऱ्याचशा प्रतिक्रिया- comments- आता काही तांत्रिक कारणास्तव पाहता येत नाहीत. तरीही, इतर मार्गांनी प्रतिक्रिया लिहिण्यास नक्कीच वाव आहे!)

मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

कोवळे स्मित
{ Blog Post # 15 }जुन्याच लेखांना अधून मधून उजाळा देण्याची खोड काही जात नाही. आजही अशीच एक पूर्वी लिहिलेली कविता...
आत्मवृत्तपर निबंध हा शाळेत शिकलेला एक अत्यंत निराळा आणि तितकाच रंजक प्रकार पुढे बऱ्याचदा उपयोगी ठरतो. Empathy skills म्हणजे नक्की काय हे उमगतं. सुरुवातीला निर्जीव वस्तू, मग साधारण परिस्थितीत ठळक भासतील अशी माणसं इथपासून ते विशिष्ट मनोवस्थेचे स्वगत लिहिण्यापर्यंत हा आत्मवृत्ताचा प्रकार पसरट आहे. सुईचे, पाटीचे आत्मवृत्त लिहिता लिहिता ठराविक मानसिक अवस्थेचे आत्मवृत्त लिहिण्याची आवड निर्माण झाली. त्यातूनच काही कविता, कथा लिहिल्या गेल्या. ही कवितासुद्धा त्याच पठडीतली आहे. 
फारशी कौतुकास्पद नाही, पण किमान आकलनीय नक्कीच. आज उगाच जवळीक वाटली आणि इथे उमटवली. आपला प्रतिसाद सांगेलच काय ते!

कविता:

शीर्षक- कोवळे स्मित


उमलत्या कळीत पराग
अन रंग-गंध अभिशाप
जनास सौंदर्याचा भास
कौमार्य कसे साहू?

स्मितास्तव आटले पाणी
रान माझे सुकले धानी
परि हुंदका रोजच कानी
किती तया मिथ्या हसवू?

सोसती मधुवचनांचे ओझे
समदुःखी जणू डोळे माझे
हटवाया स्मिताचे ओझे
भाव बोलते कसे करू?

पाटी माझी काळी कोरी
तीवर अक्षर-गर्दी सारी
कुणास ती मग भासे गोरी
रंग तिचा कसा विसरू?

***


आगामी:  गोषवारा

नऊ महिने! एका नव्या जीवाचा जन्म, शरीरांतर्गत संपूर्ण रक्ताभिसरणाच्या साधारण तीन पूर्ण फेऱ्या, नवलाईचे गणित, वर्षातले मुख्य सण साजरे होण्याचा मार्गशीर्षापर्यंतचा काळ... कित्येक गोष्टी याच एका नवाच्या समीकरणाशी नाळ जुळवून आहेत. पुढल्या महिन्यात हा ब्लॉगसुद्धा नऊ महिने पूर्ण करेल.

त्यानिमित्त, टीकात्मक लेख: गोषवारा.
हा नऊमाही गोषवारा समारोपाचा ठरेल की काय?***** **** *** ** *

या ब्लॉगद्वारे वाचक एकमेकांशी देखील जोडून राहावेत अशी इच्छा आहे. बुद्धी आहेच तर निदान विचार विनिमय व्हावा अशी अपेक्षा आहे. प्रत्येक लेखानंतर थेट facebook वापरून प्रतिक्रिया लिहिण्याची सोय अगदी त्याच साठी आहे. त्याचा पुरेपूर उपयोग होऊ द्या!उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून

ब्लॉगशी जोडलेले रहा!


***** **** *** ** *


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मनमोकळेपणाने लिहा. आपली ओळख झाकावीशी वाटली तर Open-ID चा वापर करा.

भाषा आणि लिपी सुसंगत असू द्या. उदा. मराठीतून लिहिताना देवनागरी लिपी वापरा.

शक्यतो email पाठवू नका, मात्र त्याऐवजी comment जरूर लिहा- ते सोपे आणि सोयीस्कर आहे.

MyFreeCopyright.com Registered and Protected