{ Blog Post # 3 }
जसजसे तुमचे mails येतात, comments-likes-followers दिसतात तसा हुरूप वाढतो. खरंच!
आज काही नवीन लिहावं अशा अवस्थेत मी नाही. (म्हणजे मी ठणठणीत आहे पण, ) शब्दबंबाळ झालोय..स्वतःपुरता!
कधी कधी आपण बऱ्याच लोकांशी बोलतो, बऱ्यापैकी विचार करतो, लिहितो-वाचतो आणि या सगळ्यातून शब्दांचा भडीमार होत राहतो, आपलाच आपल्यावर.. मग स्वतःपुरतं निवांत असं काही लिहू पहावं तर ते ऐनवेळी पाहुणे आल्यावर काढलेल्या रांगोळीसारखं होऊन बसतं..म्हणूनच मग आज पूर्वी लिहिलेली एक कविताच इथे लिहितोय.
मी फार कविता करत नाही, किंबहुना मी फार लिहितच नाही! 'पुरुष उवाच' नावाचा एक अप्रतिम दिवाळी अंक निघतो. जे 'पुरस्कारांवरून' तोलत असतील त्यांना म्हणून सांगतो की, या दिवाळी अंकाला जवळपास प्रत्येक वर्षी मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. 'पुरुष उवाच' ही एक चळवळ आहे, पुरुष म्हणून माणूस जाणून घेण्याची, संवेदना टिपण्याची आणि पारंपारिक 'लादलेल्या' संकल्पना झुगारून 'आहे-ते-आहे-तसे' अभ्यासण्याची! हा अंक माझ्या वाचनात आला आणि असच काही आपल्यातून उमटू शकेल असा विश्वास निर्माण झाला. त्यातूनच ही कविता सुचली..

ही कविता झर्रकन वाचण्यासारखी नाही, कारण ती तशी सुचलीच नाहीये. माझ्याच आजूबाजूला निरीक्षण करून आणि बहुतेकदा पुष्कळ मित्रांना सहज न्याहाळून ही कविता घडलीये. तिचं श्रेय अर्थातच यासर्वांना जातं.. आणि उगाच माझी म्हणून सांगत नाही, पण ही स्पर्शून जाते हे नक्की :)
कविता:
शीर्षक: पण असं कुठे बोलायचं नसतं
पुरुष होणं सोपं नसतं, पण असं कुठे बोलायचं नसतं
खळखळून हसणं
ओक्साबोक्शी रडणं
खरंखुरं घाबरणं
अन् 'बिनदिक्कत' लाजणं
जुन्या विजारी पाठोपाठ सारं टाकून द्यायचं असतं, पुरुष होणं ...
आवाजातलं घोगरेपण
राकट झालेलं हळवेपण
अर्धवट भाबडं शिवराळ तोंड
अन् शर्टाचं तुटलेलं (?) वरचं बटण
दाढी मिशांबरोबर हेही मिरवायचं असतं, पुरुष होणं ...
जमू लागलेली ताठ मान
परीटघडीतला कोता रुबाब
अमाप कष्टांना उसनं बळ
अन् साहजिक (?) अपेक्षांचं ओझं
मुक्ती-बिक्तीचं 'बायलेपण' इथे अमान्य असतं, पुरुष होणं ...
पुष्कळ जमवलेले मित्र
अन् काही मैत्रिणीही
कुणी थोडी 'खुन्नस' वाले
अन् कुणी लंगोटीयारही
बोलताना मात्र नेहमीच हातचं थोडं राखायचं असतं
पुरुष होणं सोपं नसतं, पण असं कुठे बोलायचं नसतं
या 'जमून' आलेल्या कवितेची गंमत अशी की 'पुरुष उवाच' ने ही लागलीच जशीच्या तशी छापली आणि आनंद झाला जेंव्हा माझ्या शाळेतल्या मराठीच्या 'सरांना' ती मनापासून आवडली..
अर्थात याचा अर्थ ही कविताच आहे, ही चांगलीच आहे आणि तुम्हाला ती आवडलीच पाहिजे असा बिल्कुल नाही!
उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!
उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!
३ टिप्पण्या:
उत्कृष्ट कविता आहे ही ! अगदी मनापासून आवडली
jamlay..esp. the oksabokshi radana vala..
eka "baap"avar lihilela lekh athavala..
@Deepika:
thanks!
@Sanket:
अगदी मनापासून धन्यवाद!
(the blog-content *can be shared* without editing and with due credit and mention of blog)
मनमोकळेपणाने लिहा. आपली ओळख झाकावीशी वाटली तर Open-ID चा वापर करा.
भाषा आणि लिपी सुसंगत असू द्या. उदा. मराठीतून लिहिताना देवनागरी लिपी वापरा.
शक्यतो email पाठवू नका, मात्र त्याऐवजी comment जरूर लिहा- ते सोपे आणि सोयीस्कर आहे.