विनंती: थेट comments लिहा. उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!

(पूर्वी facebook इत्यादी वापरून लिहिलेल्या बऱ्याचशा प्रतिक्रिया- comments- आता काही तांत्रिक कारणास्तव पाहता येत नाहीत. तरीही, इतर मार्गांनी प्रतिक्रिया लिहिण्यास नक्कीच वाव आहे!)

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०११

प्रकाशाच्या सणानिमित्त...
{ Blog Post # 11 }
शुभ दीपावली!
              आज प्रतिपदा. प्रत्येकच महिन्यात प्रतिपदा येते- तीही दोनदा! पण आज बलिप्रतिपदा. दिवसाचं महत्व श्रद्धेशी जोडलं गेलंय, उत्सवाचं रूप आलंय. विशेषतः व्यापारीवर्गासाठी आज नववर्ष सुरु होतंय. मला नवीन वर्ष, नवीन सुरुवात... वगैरे 'MakeOver ' संकल्पनांचं सदैव अप्रूप वाटत आलंय. आयुष्यात वेगवेगळ्या वळणांवर कितीही बदल झाले तरी आत खोलवर माणूस तोच आणि तितकाच असतो अशी माझी धारणा आहे. अगदी शून्यातून स्वर्ग उभा केलेली माणसं असोत वा निर्णायक वळणावर धाडसी पावलं टाकून नवे पायंडे रचणारे अवलिये... मूळ तेच, विस्तारही तितकाच आणि अवकाशही नेमके! त्याची रूपांतरं होत जातात एवढंच. स्वभाव आणि ऊर्जा यांच्या छटा बदलत जातात, त्यातूनच मग तथाकथित नशीब नावाची गोष्ट फळफळते किंवा कोलमडते... 
या प्रतिपदेला 'सद्यस्थितीत' करता येणाऱ्या परिवर्तनाची आशा जागवूया. जे आहे, जसे आहोत ते समजलं असेलही कदाचित, 'उमजलंय का?' ते पडताळून पाहुया. आनंदासाठी नवं जगच उभारण्याची स्वप्न पाहणारे आपण, वास्तव जगात 'आनंद' अशक्यप्राय नाही हे जाणूया!

माझ्या पाश्चिमात्य वाचकांकडे आज लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी. या चतुर्दशीस पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान नाही केलं तर आपण नरकात जातो! ... या गोष्टीतलं शैव वगळलं तरी तिचा परिणाम तोच भासतो. आजही बरेच आस्तिक एकतर अपेक्षेपोटी किंवा स्वयंकोषी धाकात देवाची आराधना करतात. प्रश्न श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा नाही, प्रयोजनाचा आहे! देवावर निरपेक्ष प्रेम शक्य नाही का? का शक्य नाही? निमगोऱ्या नास्तिकांची अवस्थाही निराळी नाही. बहुतेक निमगोरेच!

भारतदेशात तथाकथित परिवर्तनाचे वारे वाहू लागलेत. निदान भास निर्माण झालेत. अशा प्रसंगी नैतिक पातळीवर आपण आपलीच पारख करूया. ''आपल्याच कोषात तल्लख झालेली बुद्धी आपलेच समज आपल्याला पटवण्यासाठी न वापरता!" ...कारण भाव आणि मूल्यांना बुद्धीने निःशेष भाग जात नाही!

आपल्याला प्रकाशाच्या सणानिमित्त शुभेच्छा! आयुष्य हाच सोहळा असेल तर तो स्वतःपासूनच साजरा करूया, शुचिर्भूत नजरेनं :)

जाता जाता.. 

यंदा मटाचा दिवाळी अंक शब्दशः संग्राह्य आहे. नक्की असे काय आहे हे त्यातले संपादकीय वाचून कळेल. आठवणीने विकत घ्या, अगदीच मिळाला नाही तर BookGanga सारखे online पर्याय आहेतच! यावर्षी बरेच दिवाळी अंक छपाईतील विलंबामुळे उशिरा आलेत. आमचेही असेच काही समजा, कथा यापाठोपाठ झळकेलच :)
***** **** *** ** *उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता आणि इच्छा असल्यास मोबाईल क्रमांक जरूर कळवा.. आणि ब्लॉगशी जोडलेले रहा! मला twitter वर देखील follow करू शकता..  www.twitter.com/shrikantwad


***** **** *** ** *


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मनमोकळेपणाने लिहा. आपली ओळख झाकावीशी वाटली तर Open-ID चा वापर करा.

भाषा आणि लिपी सुसंगत असू द्या. उदा. मराठीतून लिहिताना देवनागरी लिपी वापरा.

शक्यतो email पाठवू नका, मात्र त्याऐवजी comment जरूर लिहा- ते सोपे आणि सोयीस्कर आहे.

MyFreeCopyright.com Registered and Protected