विनंती: थेट comments लिहा. उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!

(पूर्वी facebook इत्यादी वापरून लिहिलेल्या बऱ्याचशा प्रतिक्रिया- comments- आता काही तांत्रिक कारणास्तव पाहता येत नाहीत. तरीही, इतर मार्गांनी प्रतिक्रिया लिहिण्यास नक्कीच वाव आहे!)

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

इथे पडलेला खंड{ Blog Post # 10 }


हा ब्लॉग लिहिताना मी स्वतःशी एक गोष्ट पक्की ठरवली होती, 'अगदी एक वाचक जरी असला तरी खंड पडू द्यायचा नाही'. किमान पंधरवड्याला तरी लिहायचंच! आज तब्बल तीसहून अधिक रीतसर नोंदणी केलेले वाचक असताना मी मात्र सातत्य ठेवू शकलो नाही. सातत्य न राखल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून उपयोग नसतो; पुन्हा नव्या जोमाने अखंडता अबाधित ठेवणं महत्त्वाचं असतं. माझा प्रयत्नही तोच आहे!

'थोड्याफार गमती-जमती' या शीर्षकाखाली एक मजेशीर लिखाण इथे अपेक्षित होतं. पण ती वेळ गेली. ते किस्से (निदान माझ्यापुरते) शिळे झाले आणि खरंतर हुरूपही ओसरला. "ब्लॉग नियमितच लिहावा असं काही नाही, ती काय गिरणी आहे?", मला एकानं प्रश्नवजा सल्ला दिला होता. मला वाटतं, वाचकांचं प्रेम आणि पाठपुरावा हेच त्या तथाकथित गिरणीचं ऊर्जास्थान आहे.

आता लिहिण्यासाठी भरगच्च काही आहे आणि आजिबातच काही नाही. अभिव्यक्तीचं रितेपण आणि साचलेपण यातली तफावत जितकी कमी तितका प्रवाह खळाळता राहतो... यावर सविस्तर बोलू, पुन्हा कधीतरी!

जाता जाता एवढं नक्की सांगतो की पुढचा लेख पंधरा-वीस दिवसांत नक्की येईल. इथे पडलेला खंड हा काही संमिश्र प्रवासांतून, अनुभवांतून खर्च झालेल्या वेळेचा परिपाक आहे. असो.

दरम्यान, आपल्या पैकी अनेकांनी केलेल्या पाठ्पुराव्याबद्दल आणि दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!
***** **** *** ** *
उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता आणि इच्छा असल्यास मोबाईल क्रमांक जरूर कळवा.. आणि ब्लॉगशी जोडलेले रहा! मला twitter वर देखील follow करू शकता..  www.twitter.com/shrikantwad

***** **** *** ** *


आगामी:  साधारण अडीच वर्षांपूर्वी 'जमलेली' माझी त्यातल्या त्यात 'आवडीची' कथा - ''लेबलं'' ...दिवाळीत! आपल्या ब्लॉग पुरता हा एका कथेचा 'खास दिवाळी अंक' म्हणूया हवं तर, काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मनमोकळेपणाने लिहा. आपली ओळख झाकावीशी वाटली तर Open-ID चा वापर करा.

भाषा आणि लिपी सुसंगत असू द्या. उदा. मराठीतून लिहिताना देवनागरी लिपी वापरा.

शक्यतो email पाठवू नका, मात्र त्याऐवजी comment जरूर लिहा- ते सोपे आणि सोयीस्कर आहे.

MyFreeCopyright.com Registered and Protected